वृत्तसंस्था / रोम
सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील येथे लेझीओ आणि रोमा यांच्यात झालेल्या सामन्यावेळी उभय संघांच्या फुटबॉल शौकिनांमध्ये झालेल्या दंगलीत 24 पोलीस अधिकारी जखमी झाले.
या दंगलीमध्ये संतप्त जमावाला काबुत आणण्यासाठी पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. पण फुटबॉल शौकीनांनी पोलिसांवरच हल्ला चढविला. या दंगलीमध्ये स्टेडियममधील खुर्च्या फेकण्यात आल्या. काही ठिकाणी आगी लावण्याचा प्रकारही घडला. कचरा ठेवलेल्या कंटेनर्स पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. स्टेडियमच्या परिसरात सुमारे 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. या दंगलीमध्ये 7 जणांना अटक करण्यात आली. लेझीओ आणि रोमा यांच्यातील हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. गेल्या जानेवारीमध्ये याच फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यावेळी दंगल झाली होती आणि काही वाहनांना आगीही लावण्यात आल्या होत्या.









