कोल्हापूर : कोव्हीड प्रतिबंधाने गेली 2 वर्षे स्थगिती मिळालेल्या नवरात्रौत्सव राज्यभरात उत्साहात पार पडला. साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदीराला यावर्षी 27 लाख लोकांनी भेट दिली आहे. या संबंधीची माहीती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदिय नवरात्रौत्सव मोठ्या भक्तीभावाने पार पडला. साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणाऱ्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. यंदाच्या उत्सवात भाविकांनी अलोट गर्दी केली. नवरात्रौत्सवाच्या काळात आतापर्यंत 24 लाख भाविकांनी मंदिराला भेट दिली असून हा आता पर्यंतचा सर्वोच्च आकडा ठरला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवराज नाईकवडे यासंबंधीची माहीती देताना म्हणाले, “दोन वर्षांच्या अंतराने संपन्न झालेल्या नवरात्रौस्तवात 10 दिवसात 13 लाख 64 हजार 244 भक्तांनी मंदिराला भेट दिली. यावर्षी लांब रांगा कमी करण्यासाठी मंदिर अधिक वेळ खुले ठेवण्यात आले. यापुर्वी एका दिवसात सर्वाधिक 4 लाख बाविकांनी भेट दिली होती. पण यावर्षी हा उच्चांक मोडून नवरात्रीच्या सातव्या दिवशी जवळजवळ दुप्पट म्हणजे 7 लाख 73 हजार 721 भाविकांनी भेट दिली. यामुळे मंदिराला एकाच दिवशी सर्वाधिक लोकांनी भेट देण्याचा उच्चांक घडला आहे.”
अधिक माहीती सांगताना नाईकवडे म्हाणाले, “उत्सवादरम्यान 1 लाख 30 हजार लाडूंचे पाकिट प्रसाद म्हणून विकले गेले. यातून मंदिराला 12 लाख 99 हजार 600 रूपयांचा महसूल मिळाला. सुमारे 5 लाक भाविकांनी अंबाबाईचे ऑनलईन दर्शन घेतले तर 42 लाख लोकांनी वेबसाईटला भेट दिली.”
Previous Articleखुसखुशीत आणि जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत
Next Article देशात 2026 पासून धावणार बुलेट ट्रेन








