वृत्तसंस्था / मॉस्को
कझाकिस्तान या देशात कोळसा खाणीत लागलेल्या आगीत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 हून अधिक लोक जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा खाणीत 252 लोक काम करीत होते. आतापर्यंत 18 लोकांची सुटका करण्यात आली आहे. ही दुर्घटना पोलाद निर्मिती करणारी अर्सेलर मित्तल या कंपनीच्या खाणीत घडली असे स्पष्ट करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीही याच कंपनीच्या खाणीत आग लागून 2 जणांचा मृत्यू झाला होता. कंपनीने या आगीच्या दुर्घटनांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.









