कोल्हापूर प्रतिनिधी
दरवर्षी ज्योतिबा यात्रेसाठी आठ ते दहा लाख भाविक येतात. यात्रेमध्ये आरोग्य विभाग मार्फत वैद्यकीय सुविधा देण्यासाठी तीन वैद्यकीय पथके तीन शिफ्टमध्ये 24 तास कार्यरत असून पहिले पथक तालुका दवाखाना, दुसरे पथक मंदिरा मध्ये व तिसरे पथक गायमुख परिसर मध्ये कार्यरत आहेत. 16 वैद्यकीय अधिकारी, 21 समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासह एकुण 223 आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. 18 रुग्णवाहिका विविध ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी कार्यरत असून पाणी शुद्धीकरणासाठी 13 पथके 24 तास कार्यरत ठेवली आहेत. त्यामध्ये 34 आरोग्य सहायक व 69 आरोग्य सेवक यांची नेमणूक केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
वैद्यकीय पथकाची ठिकाणे वगळून अन्य 8 ठिकाणच्या रुग्णवाहिकेमध्ये 1 समुदाय आरोग्य अधिकारी व 1 आरोग्य कर्मचारी व वाहन चालक यांची नियुक्ती केली आहे. तालुका दवाखान्याच्या ठिकाणी कोविड लसीकरण व कोविड स्वाब नमुना तपासणी सुविधा करण्यात आले आहे. जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यात्रेकरूंसाठी वैद्यकीय सुविधा केखले, बोरपाडळे,भूये, वडणगे या 4 प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये 24 तास सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीकरिता उपजिल्हा रुग्णालय कोडोली येथे 10 बेड व सीपीआर हॉस्पिटल येथे 25 बेड सुसज्ज ठेवले आहेत.
3 एप्रिल ते 5 एप्रिल दुपारी 2 वाजेपर्यंत 3 वैद्यकीय पथकामध्ये बाह्य रुग्ण 966 व अंतररुग्ण 5 असे एकून 971 रुग्णावर औषधे उपचार केले असून 10 रुग्ण संदर्भित केले असल्याची डॉ. साळे यांनी सांगितले.