आशिष आडिवरेकर / कोल्हापूर
पोलिसाची नोकरी म्हणजे 24 तास अलर्ट, त्यातून कोणताही पोलीस सुटत नाही… कोल्हापुरात वाढणारी आंदोलनांची संख्या… मंत्र्यांचे प्रोटोकॉल… यासह वाहतूक व्यवस्था यामुळे पोलिसांवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे `सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिद वाक्य घेऊन 24 तास जनतेच्या सेवेत असणाऱया पोलीस दलाचे आरोग्यच धोक्यात आले आहे. पोलीस नाईक विजय घाटगे याचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू पोलीस दलावरील कामाचा ताण अधोरेखित करत आहे.
घरात वाद झाला चला पोलीस स्टेशनला… शेतीचा वाद, काहीही झाले तरी चला पोलीस स्टेशनला सध्या पोलीस दलाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्वी पोलीस ठाण्याची पायरी चढणे म्हणजे नागरिकांच्या छातीत गोळा येत होता. आता मात्र वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीसांच्या छातीत गोळा येण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस अधिकारी कर्मचाऱयांना सध्या 12 – 12 तास डÎुटीचे शेडÎूल आहे. याचसोबत कोल्हापूरात सध्या आंदोलनांचे प्रमाण वाढले आहे. याचसोबत या आंदोलनाची तीव्रताही वाढली असून या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची जबाबदारी पोलिसांवर असते. कोरोना काळातही पोलिसांनी खडा पहारा देत लॉकडाउन कडक राबविले. यातच कोल्हापूर जिह्यात सध्या तीन मंत्री आहेत. या तीन मंत्र्यांचा प्रोटोकॉलची जबाबदारीही पोलीस दलावरच आहे. गेल्या दोन वर्षात तर लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणूका. कोरोना काळातील बंदोबस्त, मराठा आंदोलन यासह विविध कारणांमुळे पोलीस खात्यावरील कामाचा ताण वाढला आहे.
आता आगामी काळात तर यामध्ये आणखीनच भर पडणार आहे. येऊ घातलेल्या महापालिका, सहकारी संस्थांची निवडणूक यामध्ये बंदोबस्ताचा ताण आणखी वाढणार आहे. कोल्हापूर आयुक्तालयाचा गेल्या 30 वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. कोल्हापूरामध्ये आयुक्तालय झाल्यास पोलीस दलाची अधिकारी, कर्मचारी संख्या वाढणार आहे.
आठ तासांची ड्युटी करा
गृह विभागाने मुंबईमध्ये पोलीसांची डÎूटी आठ तासांची केली आहे. मात्र राज्यात अन्यसर्वच ठिकाणी पोलिसांची डÎूटी 12 तासाची आहे. मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूरमध्येही 8 तासांची डÎूटी करण्यात यावी अशी मागणी पोलीस दलातून होत आहे.
पद मंजूर पदे कार्यरत रिक्त
सहाय्यक फौजदार 303 253 53
हवालदार 664 624 40
पोलीस नाईक 663 622 41
पोलीस कॉन्स्टेबल 1371 1329 42
– मोहन पोवार ः शेतकरी आंदोलन काळात मृत्यू
– जालंदर चिले ः आकस्मिक मृत्यू
– सर्जेराव खोत ः कोरोना काळात मृत्यू
– संदीप जगताप ः कोराना काळ मृत्यू
– महादेव आबिटकर ः आकस्मिक मृत्यू
– भरत पाटील ः आकस्मिक मृत्य
– विजय घाटगे ः आकस्मिक मृत्यू (हृदयविकार)
तणाव कमी करण्यासाठीच रजेची सक्ती
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण आहे. पोलीस ठाण्याचे काम, बंदोबस्त, यामुळे कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत आहे. यातून कर्मचारी आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवू शकत नाही. त्यांना वेळ देऊ शकत नाही. यामुळे या ताण तणावामध्ये आणखीनच भर पडत आहे. याच कारणामुळे कर्मचाऱयांनी अर्जित व प्रवासी रजा सक्तीने घ्यावी असे आदेश दिले आहेत. रजा घेतल्यानंतर काही काळ तणावमुक्त होऊ शकता. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
हे आहेत उपाय
– 8 तासाची डÎूटी करणे
– सुटÎांचे नियोजन वेळोवेळी करणे गरजेचे
– वैद्यकीय तपासणी
– आधुनिक साधन सामग्री
– आयुक्तालायचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक
– अंबाबाई मंदिर सुरक्षा व्यवस्था वेगळी करणे









