अन्न, वाचन, वास्तव्यासह सर्वप्रकारच्या सुविधा
हैदराबादच्या कोठापेट येथील ‘ओपन हाउस सर्वांसाठी सदैव खुले असते. कुठल्याही धर्म किंवा जातीचा असला तरीही येथे निसंकोचपणे जाता येते. स्वत:ची भूक भागविण्यासाठी येथे स्वयंपाक करता येतो आणि पुस्तके वाचत वेळ घालविता येतो आणि आरामही करता येतो. येथे कुठलाच प्रश्न विचारला जात नाही. या ओपन हाउसचे नाव ‘अंदारी इल्लू’ आहे. जर तुम्ही हैदराबादमध्ये एखाद्या कामासाठी गेला असाल तर तुमच्यासाठी अंदारी इल्लूचे दरवाजे सदैव उघडे असतात. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, जर कुणाकडे पोट भरण्यासाठी पैसे नसतील तर तो स्वत:साठी येथे स्वयंपाक करू शकतो. येथे तांदूळ, भाज्या, आवश्यक भांड्या अन् गॅस स्टोव्ह उपलब्ध असतो. येथे कोण काय करतोय हे पाहण्यासाठी कुठलाच सुरक्षारक्षक तसेच सुपरवाइजर नसतो.
एका डॉक्टराचा अनोखा पुढाकार
डॉ. सूर्यप्रकाश विंजामुरी हे एक समाजसेवक आहेत, 1999 मध्ये त्यांनी लाइफ-हेल्थ रीफइनफोर्समेंट नावाची एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. याचा मुख्य उद्देश मानवी जीवनाचे रक्षण आणि आरोग्याला चालना देणे आहे. ओपन हाउसमध्ये जो कुणी येतो, त्याला आपण एक माणूस आहोत हे सिद्ध करावे लागत नाही. लोक स्वत:ची भूक भागविण्यासाठी येत असतात. जेवल्यावर काय करावे याचा निर्णय देखील तेच घेतात असे त्यांनी सांगितले.
अनेक लोकांच्या स्वप्नांची पूर्तता
डॉ. सूर्यप्रकाश विंजामुरी आणि त्यांच्या पत्नी एस.व्ही.व्ही. कामेश्वरी मागील अनेक वर्षांपासून लोकांची भूक भागवत आहेत. सर्वप्रथम त्यांनी केळ्याची गाडी (बनाना कार्ट) नावाची योजना सुरू केली. ज्या लोकांकडे पैसे असायचे, ते केळी खरेदी करायचे आणि ज्यांच्याकडे पैसे नसायचे ते मोफत केळी खाऊ शकत होते. 14 वर्षांपूर्वी त्यांनी ‘ओपन हाउस’ सुरू केले. आतापर्यंत हजारो लोकांनी येथे वास्तव्य करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. हे लोक ओपन हाउसमध्ये व्यतित केलेल्या दिवसांची आठवण काढत असतात. तसेच सूर्यप्रकाश यांच्या मोहिमेत अनेक जण सामील झाले आहेत.
अनेक लोकांचा सहभाग
ओपन हाउसची मालकी संस्थेकडे आहे. ज्या क्षणी तुम्ही एखाद्या गोष्टीचे मालक होऊ लागता, तेव्हा तुमचे जीवन दयनीय होऊ लागते असे सूर्यप्रकाश सांगतात. त्यांच्या विचारांनी प्रभाजवित होत अनेक लोकांनी या कार्यात भाग घेला आहे.
पुस्तकालयांवर भर
ओपन हाउसची सुरुवात केवळ भोजनाद्वारे झाली, नंतर भोजन आणि अन्न दोन्ही गोष्टी पुरविण्याच्या विचारातून पुस्तके ठेवण्यात आली. आता संस्थेकडून विविध ठिकाणी 100 पुस्तकालये चालविली जात आहेत. या पुस्तकालयांमध्ये मुलांना विविध कलागुणांचे धडे दिले जात असल्याचे सूर्यप्रकाश म्हणाले.









