बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेशी संलग्न धारवाड विभागीय 23 वर्षाखालील संघ निवडीसाठी गुरुवार दि. 3 डिसेंबर रोजी हुबळीतील राजाजीनगर, केएससीए मैदानावर निवड चाचणी होणार आहे, अशी माहिती केएससीए धारवाड झोनचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी दिली. पात्र, इच्छुक खेळाडूंनी चाचणीसाठी दि. 3 रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. 1 सप्टेंबर 1997 किंवा त्यानंतरचा जन्म असणे आवश्यक असेल. निवडीसाठी पात्र खेळाडूंनी एसएसएलसीचे मूळ गुणपत्रक सोबत आणणे सक्तीचे आहे. झेरॉक्स कॉपी ग्राहय़ धरले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी व्यवस्थापक टोनी झलकी, सहायक व्यवस्थापक रविंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधता येईल.









