नवी दिल्ली :
जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारामध्ये 22 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे पाहायला मिळाले आहे. जागतिक अस्थिरता असली तरी भारतीय शेअरबाजार मात्र सध्याला गतिमान दिसत आहे. हीच तेजी व स्थिरता पाहून विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात गुंतवणूक केल्याचे पाहायला मिळाले आहे. मे आणि जूनमध्ये अनुक्रमे विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारामध्ये 43,838 कोटी, 47 हजार 148 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 7 जुलैपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी शेअरबाजारामध्ये 21 हजार 944 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे मार्चपूर्वी 34 हजार 625 कोटी रुपये जानेवारी आणि फेब्रुवारीत गुंतवणूकदारांनी बाजारातून काढूनही घेतले होते. मान्सूनची सर्व भारतभर यशस्वी वाटचाल आणि तिमाहीचे आश्वासक निकाल लागण्याच्या शक्यतेने गुंतवणूक वाढली आहे.









