► वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात 9 महिला नक्षलवाद्यांसह 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांपैकी दोघांवर 8 लाख रुपयांचे आणि दोघांवर 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांची प्रभावी तैनाती, छावण्यांचा विस्तार आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे नक्षलवादी आत्मसमर्पण करत असल्याचे सीआरपीएफचे डीआयजी आनंद सिंह राजपुरोहित यांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेले सर्वजण आता मुख्य प्रवाहात येतील आणि समाजासाठी सकारात्मक काम करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सरकारी योजनांअंतर्गत पुनर्वसन आणि अन्य लाभ दिले जाणार आहेत.









