कोल्हापूर :
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट मार्फत घेण्यात येणाऱ्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी सीए परीक्षेत उत्तुंग यश मिळवत कोल्हापूरचा झेंडा फडकावला आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापूरमधून 282 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 21 विद्यार्थी सीए परीक्षेत उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागातून आयुष पंडित यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आशिष कारीरा यांनी व्दितीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, नातेवाईक, मित्र मंडळींनी अभिनंदन केले.
सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून हितेश गावित, जयंत गोरुले, नम्रता सुर्वे, हिमांशू जवळकर, आदित्य पेंडुरकर, विरेश कोळकी, मोनिश सुरेश, स्वरूप मिरजकर, सिद्धेश मोहोळकर, आकाश कातकर, युगंधरा पागे, प्राची संघवी, आशना वच्छाणी, शिवांजली शिंदे, शिवकुमार कोवाडे, निकिता पाटील, मोक्षा शाह, समृद्धी सरदेसाई, प्रणाली बकरे यांनी यश मिळवले आहे. हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. अखिलेश जोशी यांनी पुणे केंद्रातून सीए परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अभ्यासातील सातत्य, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सीए परीक्षेत यश संपादन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तकांचा अभ्यास करावा. अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने परीक्षेचा अभ्यास करावा. जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्या असा सल्ला यशस्वी विद्यार्थ्यांनी सीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.








