Kerala Tourist Boat Tragedy : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागात रविवारी संध्याकाळी थुवलाथिराम किनारपट्टीजवळ हाऊसबोट उलटून 22 जणांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये सात मुले आणि काही महिलांचाही समावेश आहे.सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 ते 50 लोक होते.घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. घटनास्थऴी NDRF ची टीम दाखल झाली असून स्थानिक प्रशासन देखील तैनात आहेत.बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी अंडरवॉटर कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.
बोट मालकावर गुन्हा दाखल
बाहेर काढण्यात आलेल्यांना थिरूर,तनूर आणि कोझिकोड येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.त्यापैकी बहुतांश लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे.याप्रकरणी बोटीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,या बोटीला फिटनेस प्रमाणपत्र नव्हते.तसेच बोटीवरील लोकांना लाइफ जॅकेटही देण्यात आलं नव्हते.
दोन लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या अपघातावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पीएम मोदींनीही या घटनेबद्दल ट्विट केले आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “केरळमधील मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने मी दुखावलो आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाईल असेही मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त करणारे निवेदन जारी केले आहे. मलप्पुरमच्या जिल्हाधिकाऱ्यांना समन्वित आपत्कालीन बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले. अग्निशमन आणि पोलीस तुकड्या, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील तनूर आणि तिरूर भागातील स्थानिक लोक बचाव कार्यात सहभागी आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. मंत्री अब्दुररहिमन आणि रियास हे बचाव कार्याचे समन्वय साधतील असेही सांगण्यात आले आहे.
राहुल गांधींनी केले मदतीचे आवाहन
राहुल गांधी यांनी ही ट्विट करत सात्वन केले आहे. केरळमधील मलप्पुरममध्ये हाऊसबोट पलटी झाल्याच्या वृत्ताने अस्वस्थ झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना आणि जखमी झालेल्यांसाठी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना बचाव कार्यात अधिकाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन करतो, असेही राहुल गांधी म्हणाले.
अजूनही अनेक मुले बेपत्ता-मंत्री पीए मोहम्मद रियास
त्याचबरोबर केरळचे पर्यटन मंत्री पीए मोहम्मद रियास यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की, या अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये विशेषतः लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या सुट्टीत मुले हाऊसबोटीवरून जात असताना ही घटना घडली. अजूनही अनेक मुले बेपत्ता असल्याच्या बातम्या येत असून, त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीमही राबवली जात आहे.
घटनास्थळी दाखल झालेले पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना कशी घडली याचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे. या घटनेबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास घडला.आतापर्यंत पाण्यातून बाहेर काढलेल्या लोकांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे काही लोकांवर उपचार सुरु आहेत. अपघाताचे नेमके कारण सध्या समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आम्ही संपूर्ण घटनेचा तपास करत आहोत, असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









