वॉशिंग्टन
दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलातील लास तेजेरियास शहरात भूस्खलनात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 50 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळधार पावसानंतर येथे दरड कोसळली. लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने येथील अनेक घरे पाण्याच्या विळख्यात अडकल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले. 30 वर्षांनंतर लास तेजेरियास या सर्वात मोठय़ा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पूर आला आहे. यापूर्वी 1999 मध्ये वर्गास शहरात भूस्खलन झाले होते ज्यात 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.









