वेंगुर्ले (वार्ताहर)-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 6 रस्त्यांच्या कामासाठी 22 कोटी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.येथील सप्तसागर बिल्डींग मधील वेंगुर्ले तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात या विकास कामाबाबतची माहिती देताना शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम याचा समावेश होता .
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग ग्रामीण भागातील अत्यावश्यक रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. स्थानिकांच्या मागणीनुसार अत्यावश्यक रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. स्थानिकांनी सूचविलेल्या या कामांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी स्थानिक आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ही कामे प्राधान्याने मंजूर व्हावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात प्रस्तावासाठी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविलेल्या कामातील सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 6 कामांसाठी 22 कोटी 10 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. 2 अंतर्गत मंजूर झालेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील कामात आंबोली गेळे कावळेशेत पॉईंट मार्ग रस्ता, सांगेली सनमटेंब रस्ता, वजराट देवसू कामळेवीर रस्ता, दाभोली ते वायंगणी रस्ता, चौकुळ ते कशाचीवाडी रस्ता, फुकेरी हनुमंतगड ते चौकुळ कशाचीवाडी रस्ता अशी ग्रामीण भागीतील 6 कामांसाठी 22 कोटी 10 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. असे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी स्पष्ट केले .









