शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
शनिवार दि. 22 एप्रिल रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, शहापूर विभागाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नेताजी जाधव होते.
शनिवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे सकाळी 9.30 वाजता कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने 24 मे रोजी होणारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली असून 27 मे रोजी शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. याची नोंद वडगाव व शहापूर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.








