मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मानले भारतीय लष्कराचे आभार
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये 3 मे रोजी वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर म्यानमारमध्ये आश्र्रय घेतलेले राज्यातील 212 पुऊष आणि स्त्रिया शुक्रवारी मणिपूरला सुखरूप परतले, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी शनिवारी सांगितले. या घरवापसीबद्दल मुख्यमंत्र्यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. मणिपूरमध्ये परतलेले सर्व लोक मैतेई समुदायाचे असून ते म्यानमार सीमेवरील मोरेहचे रहिवासी आहेत. मणिपूरमधील लोकांना सुखरूप परत आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले.
मणिपूरच्या मोरेह शहरात 3 मे रोजी झालेल्या अशांततेनंतर म्यानमार सीमेपलीकडे सुरक्षितता शोधणारे 212 सहकारी भारतीय नागरिक (सर्व मैतेई) आता सुरक्षितपणे भारतीय भूमीवर परतले आहेत, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मैतेई समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ मणिपूरच्या पहाडी जिह्यांमध्ये 3 मे रोजी ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढण्यात आल्यानंतर हिंसाचार झाला. मणिपूरमधील मैतेईंची लोकसंख्या सुमारे 53 टक्के असून बहुतेक इम्फाळ खोऱ्यात राहतात. दुसरीकडे, आदिवासी नागा आणि कुकी समुदाय 40 टक्क्मयांच्या आसपास असून ते डोंगराळ जिह्यांमध्ये राहतात.









