मुंबई :
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनोमिक झोन लिमिटेड या अदानी समूहातील कंपनीला जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत 2114 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता सदरचा नफा हा 82 टक्के अधिक असल्याचे सांगितले जाते. मागच्या वर्षी कंपनीने जून तिमाहीअखेर 1158 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. याच कालावधीतील महसूलही वर्षाच्या आधारावर 23 टक्के वाढत 6247 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षी हाच महसूल कंपनीने 5058 कोटी रुपयांचा प्राप्त केला होता.









