यल्लापूर येथील कन्नड माध्यम शाळेतील प्रकार
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील यल्लापूर येथील नामवंत वाय. टी. एस. एस. शैक्षणिक संस्था संचालित कन्नड माध्यमाच्या माध्यमिक शाळेतील 21 विद्यार्थ्यांना व दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या घटनेने जिल्हय़ातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
काही दिवसांपूर्वी दहावीत शिकणाऱया एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली होती. 123 जणांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. यापैकी 21 विद्यार्थ्यांना व दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. वाय. टी. एस. एस. शैक्षणिक संस्थेकडून कन्नड माध्यम आणि इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा तसेच पदवीपूर्व महाविद्यालय चालविले जाते. तथापि, कोरोनाची लागण झालेल्या कन्नड माध्यम माध्यमिक शाळेचे आवार स्वतंत्र असल्याने इंग्रजी मध्यमाच्या व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भयभीत होण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. या घटनेबद्दल यल्लापूरचे तहसीलदार श्रीकृष्ण कामकर म्हणाले, प्राथमिक व द्वितीय टप्प्यातील संपर्क झालेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येतील. इतर विद्यार्थ्यांच्या स्वॅबची तपासणी मंगळवारी करण्यात येईल. शैक्षणिक संस्था सीलडाऊन करायची की नाही, याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. सोमवारी अंकोला तालुक्मयात 7, कारवार तालुक्मयात 3 व शिरसी तालुक्मयात एक कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.









