कोलकाता : भाजपाचे पश्चिन बंगालमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले मिथुन चक्रवर्ती यांनी शनिवारी राज्यतील 21 टीएमसी आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मिथून चकव्रर्ती यांनी सांगितले की, ते जुलैमध्ये जे काही बोलले त्यावर ठाम आहेत. सत्ताधारी टीएमसीचे एकूण 38 आमदार आपल्या संपर्कात असून त्यापैकी 21 थेट संपर्कात आहेत.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले “मी जुलैमध्ये जे बोललो होतो त्यावर ठाम आहे. अजूनही 21 टीएमसी आमदार थेट माझ्या संपर्कात आहेत. काही वेळ थांबा, तुम्हाला सर्व काही कळेल,” असे ते म्हणाले. “मला अक्षेपांची चांगली जाणीव असून मी मुर्ख नाही. तसेच त्याच चुका पुन्हा होणार नाहीत” असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपच्या प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार उपस्थित होत्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









