वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियातील खासगी सैन्यसमूह वॅगनरच्या प्रमुखाकडून अलिकडेच राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात बंड करण्यात आले होते. यामुळे रशियाचे युक्रेन युद्धातील लक्ष काहीसे विचलित झाल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी रशियाच्या 21 हजार भाडोत्री सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. तर रशियाचे 80 हजार भाडोत्री सैनिक जखमी झाल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
रशियाच्या खासगी सैन्याला मोठे नुकसान झाले आहे. पूर्व युक्रेनमध्ये वॅगनर समुहाची मोठी पिछेहाट झाली आहे. वॅगनरचे भाडोत्री सैनिक हे प्रामुख्याने गुन्हेगार असल्याचा दावा झेलेंस्की यांनी केला आहे.
वॅगनरचे बंड पाहता आता पुतीन यांच्या जीवाला अधिक धोका आहे. केवळ रशिया मला ठार करू पाहत आह, तर पूर्ण जग पुतीन यांचा मारू पाहत असल्याचे उद्गार झेलेंस्की यांनी काढले आहेत.









