वृत्तसंस्था/ जिनिव्हा
2032 साली होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपद देशाची घोषणा पुढील महिन्यात होणार आहे. जुलै महिन्यात टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेवेळीच आयओसीच्या बैठकीमध्ये 2032 च्या ऑलिम्पिक स्पर्धा भरविणाऱया देशाची अधिकृत घोषणा केली जाईल. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहराला यजमानपदाची संधी मिळणार असून त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब जुलै महिन्यात केला जाईल.
गुरुवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अध्यक्ष थॉमस बाक यांनी 2032 ऑलिम्पिक स्पर्धा भरविणाऱया ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनची औपचारिक घोषणा केली आहे. टोकिओमध्ये सुरू होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी दोन दिवस अगोदर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक घेतली जाणार असून या बैठकीत ब्रिस्बेनच्या यजमानपदावर शिक्कामोर्तब केला जाईल. 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा पॅरीसमध्ये तर 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजेल्समध्ये होणार आहे.









