203 extra buses from PMPML for Alandi Yatra कार्तिकी एकादशी व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळय़ानिमित्त आळंदी येथे जाण्यासाठी उद्यापासून (दि.17) पासून 23 नोव्हेंबरपर्यंत सहा दिवस पीएमपीएमएलच्या ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
खास यात्रेसाठी या मार्गावरील नियमीत 97 व जादा 203 अशा एकूण 300 बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यात 19 ते 22 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत रात्री सुद्धा गरजेनुसार बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून ते काटेवस्ती येथून संचलन करण्यात येणार आहे.
ज्यादा बसेस व त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :
1) स्वारगेट ते आळंदी – दि. 19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील.
2) हडपसर ते आळंदी – दि.19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरु राहणार आहे.
3) पुणे स्टेशन ते आळंदी – दि. 19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरु राहणार आहे.
4) म.न.पा. भवन ते आळंदी – दि. 19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरु राहणार आहे.
5) निगडी ते आळंदी – दि. 19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरु राहणार आहे.
6) पिंपरी ते आळंदी – दि. 19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरु राहणार आहे.
7) चिंचवड ते आळंदी – दि.19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरु राहणार आहे.
8) देहूगाव ते आळंदी – दि. 17, 18,19 ते 23 तारखेपर्यंत रात्री बससेवा सुरु असणार आहे.
9) भोसरी ते आळंदी – दि.17 ते 23 तारखेपर्यंत रात्री बससेवा सुरु असणार आहे.
10) रहाटणी ते आळंदी – दि.19 ते 22 रात्री बससेवा. तर 17, 18 व 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरु राहणार आहे. ही बससेवा गरजेनुसार रात्री सोडण्यात येणार आहे. तसेच रात्री सोडण्यात येणाऱ्या बसेसचे तीकीट दर हे नियमीत सोडण्यात येणाऱ्या बस पेक्षा पाच रुपयांनी जास्त असणार आहेत. याबरोबरच रात्री 11 नंतर कोणताही पास या बससेवांसाठी वापरता येणार नाही.
अधिक वाचा : महाराष्ट्रात थंडी वाढणार
याबरोबरच क्रमांक 264 भोसरी ते पाबळ व मार्ग क्रमांक 257 आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णत: बंद राहतील. तरी संबंधित मार्गावरील प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएलला सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.








