कम्पॅरिझन फर्मच्या अहवालातला अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍमेझॉन या ऑनलाईन प्लॅटफार्मच्या आधारे ग्राहकांना सेवा देणारी दिग्गज कंपनी म्हणून जगभरात ओळखली जाते. या कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस हे सध्या जगात पहिल्या नंबरचे श्रीमंत गृहस्थ आहेत. परंतु ते आगामी सहा वर्षात जगातील पहिले ट्रिलेनियर बनणार असल्याचा अंदाज कम्पॅरिझन या संस्थेने नोंदवलेल्या निरिक्षणामधून मांडला आहे.
जेफ बेजोस यांची सध्या 14,300 डॉलरची संपत्ती आहे व त्यांचे वय 56 आहे तर आणखीन सहा वर्षांनी त्यांचे वय 62 वर्ष होणार आहे. या अभ्यासामधून न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेट असणाऱया अतिशय महत्वाच्या कंपन्या आणि फोर्ब्स यामध्ये समावेश असणाऱया 25 सर्वाधिक श्रीमंत लोकांचा तुलनात्मक अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मागील पाच वर्षातील कंपन्यांची आणि वैयक्तिक कामगिरीच्या वृद्धीच्या आधारावर हे संकेत देण्यात आल्याचे या संस्थेने स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनमध्ये ऍमेझॉन तेजीत
जगाला विळखा घातलेल्या कोविड 19च्या माऱयामुळे जगाची अर्थव्यवस्था काळजीत पडली आहे. यामध्ये मात्र काही निवडक क्षेत्रातील उद्योग तेजीत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये ऍमेझॉनचा ई कॉमर्स व्यवसाय मात्र तेजी अनुभवतो आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीत कंपनीने 75 अब्ज डॉलरची विक्री केली आहे. आणखीन लॉकडाऊन वाढल्यावर नफा कमाईत ऍमेझॉन राहण्याचे संकेतही यावेळी व्यक्त करण्यात आले आहेत.









