वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद सध्या माजी करर्णधार सौरभ गांगुली भूषवित आहे. 2023 सालापर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षपद गांगुलीकडेच ठेवावे असे वैयक्तिक मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
2023 सालातील आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. सौरभ गांगुली बीसीसीआय अध्यक्ष म्हणून आपल्या भारतीय संघ चषकासमवेत पाहण्याची आपली तीव्र इच्छा असल्याचे गावसकरने म्हटले आहे. गावसकरने एका इंग्रजी दैनिकातील स्तंभ लेखामध्ये याचा उल्लेख केला आहे. भारतीय क्रिकेट मंडळ आणि या मंडळाची संलगन असलेल्या काही मान्यता प्राप्त संघटनांनी सर्वोच न्यायालयाच्या निर्णयाच्या सुनावणीला स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात क्रिकेटपेक्षा अधिक महत्त्वाची प्रकरणे आहेत. पण भारतीय क्रिकेट शौकिनांची सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची आतुरर्ता निर्माण झाली आहे पण सौरभ गांगुली आणि त्याचा भारतीय संघ 2023 सालातील विश्वचषकासमवेत एकत्रित पाहण्याची माझी इच्छा असल्याचे गावसकरने म्हटले आहे.









