लंडन
कतारमध्ये होणाऱया 2022 फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लिश मॅनेजर गॅरेथ साऊथगेट व सहायक प्रशिक्षक स्टीव्ह हॉलंड यांच्या करारांचे नुतनीकरण केले गेले. गॅरेथ व स्टीव्ह या दोन्ही पदाधिकाऱयांनी नव्या करारावर स्वाक्षरी केली. आता डिसेंबर 2024 पर्यंत ते आपल्या पदावर कार्यरत राहतील. साऊथगेट मागील 5 वर्षांपासून इंग्लिश संघाला प्रशिक्षण देत आले असून या कालावधीत संघाची कामगिरी अव्वल स्वरुपाची राहिली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली इंग्लंड संघाने फिफा वर्ल्डकप सेमीफायनलपर्यंत धडक मारली. शिवाय, युफा नेशन्स लीग स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. युफा युरो हंगामातील त्यांची यंदाची कामगिरी 55 वर्षातील सर्वोत्तम राहिली. फिफा 2022 वर्ल्डकप स्पर्धा पुढील वर्षी 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत होणार आहे.









