सोल
मोबाइल क्षेत्रात आघाडीवरची कंपनी सॅमसंग पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये तीन नवे फोल्डेबल स्मार्टफोन्स सादर करणार आहे. ओएलइडी रिसर्च फर्म युबीआय रिसर्चने वरील माहिती नुकतीच दिली आहे. गॅलक्सी झेड फ्लीप 2, गॅलक्सी झेड फोल्ड 3 व न्यू गॅलक्सी झेड फोल्ड लाइट हे तीन फोल्डेबल स्मार्टफोन्स पुढील वर्षी कंपनी बाजारात दाखल करणार आहे. या सर्व स्मार्टफोन्सना अल्ट्रा-थीन ग्लासचा आधार असणार आहे.









