डिसेंबर 2019 मधील अनुमान 5.6 टक्क्यात घट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फिच या आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेकडून 2020-21 साठी देशातील आर्थिक विकासाच्या वृद्धी दरातील(जीडीपी) अनुमानात घट करुन 5.1 टक्के केले आहे. या अगोदर डिसेंबर 2019 मध्ये जीडीपी फिचने 5.6 टक्के राहणार असल्याचे अनुमान मांडले आहे. फिचने हे अनुमान कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर आधारीत निश्चित केले असल्याचे म्हटले आहे.
पुरवठा थांबल्यास गुंतवणुकीवर परिणाम
आगामी काही आठवडय़ांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यामुळे आर्थिक नुकसान वाढण्याचे संकेतही वाढल्याचे रेटिंग संस्था फिचने शुक्रवारी सादर केलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक आउटलूक-2020 च्या अहवालात नोंदवले आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 चे अनुमान
कोरोनाच्या प्रभावामुळे व्यापार उद्योग चिंतेत आहेत. दुसरीकडे भारताला उत्पादनासाठी आवश्यक असणाऱया पार्ट्ससाठी चीनचा आधार घ्यावा लागतो. परंतु सध्याच्या घडीला मात्र आयात निर्यात बंद असल्यामुळे याचा प्रभाव जीडीपीवर होणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे येत्या 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.4 टक्क्यांवर राहणार असल्याचे अनुमान फिचने मांडले आहे.
आर्थिक घडामोडीचा प्रभाव
भारतामध्ये आर्थिक सिस्टममधील असणारी कमजोरी आणि त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष होणारा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचा प्रभाव जीडीपीच्या दरावर होत असल्याचे फिचने नमूद केले आहे. यामध्ये येस बँक, पीएनबी बँक यांच्या आर्थिक संकटाचाही परिणाम आर्थिक क्षेत्रावर होत असल्याचे फिचने म्हटले आहे.









