नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी ओमॅक्स यांनी स्थावर मालमत्ता विक्रीतून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2 हजार 51 कोटी रुपयांची प्राप्ती साध्य केली असल्याचे सांगण्यात येते. कंपनीने सदरच्या विक्रीत मागच्या तुलनेत 18 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. मागच्या म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनीने विक्रीतून 1 हजार 738 कोटी रुपये प्राप्त केले होते. राष्ट्रीय राजधानी विभाग आणि चंदीगड येथे त्यांच्या व्यावसायिक प्रकल्पाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.









