नवी दिल्ल
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे. या देशात विविध कारणामुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. 2019 मध्ये काश्मीरमध्ये 213 दिवस इंटरनेट बंद राहिले होते. तसेच मोबाईल सेवाही संथपणे सुरू होती. राजधानी दिल्ली आणि विविध सीमांवर होत असणाऱया आंदोलनादरम्यान मोबाईल नेटवर्क बंद ठेवण्यात आले होते. नवीन अहवालानुसार 2020 मध्ये जवळपास 8927 तास इंटरनेट बंद राहिले होते. परंतु याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन साधारणपणे 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. समाजामध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक वातावरण गढूळ होण्याची भीती निर्माण होत असल्याच्या कारणास्तव सरकारने यासंदर्भात वेगळे निर्णय घेण्यावर भर दिला आहे. संवेदनशील प्रकरणांच्या वादांवर आळा बसविण्यासाठी विदेश मंत्रालयाकडून नवीन नियम सादर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.









