वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील प्रमुख ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट इंडिया कंपनीला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जवळपास 3.15 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सदरचा तोटा हा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 3.83 हजार कोटींपेक्षा कमी असल्याची नोंद केली आहे.
फ्लिपकार्ट ही वॉलमार्टच्या मालकीची कंपनी आहे. फ्लिपकार्ट इंडिया देशातील मोबाईल, टेलिव्हीजन, लॅपटॉप, मोबाईल, ऍक्सेसरीज आणि फुटविअर यासारख्या अन्य उत्पादनांचे होलसेल वितरण करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते.
एकूण उत्पन्नाच्या तुलनेत 11.88 टक्क्यांनी उत्पन्न वाढून 34.61 हजार कोटी रुपयांवर राहिले आहे. जे मागील आर्थिक वर्षात 3.93 हजार कोटींवर राहिले होते, अशी माहिती बिजनेस इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म टॉफ्लरच्या माहितीतून समोर आली आहे.
ऍमेझॉनसोबत टक्कर
ऑनलाइन ई कॉमर्स क्षेत्रात भारतात अलीकडे विविध कंपन्यांची चांगलीच स्पर्धा जाणवत आहे. यात फ्लिपकार्टचा वाटाही लक्षणीय राहिला आहे. ई कॉमर्स क्षेत्रात कंपनीची ऍमेझॉनसोबत मोठी टक्कर सुरु आहे.









