ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सन 2020 मध्ये देशभरात 13,000 हून अधिक रेल्वे अपघात झाले. या अपघातात जवळपास 12,000 लोकांचा मृत्यू झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात हे उघड झाले आहे. या अहवालानुसार, मागील वर्षी रेल्वे अपघातांमध्ये दररोजच्या मृतांची संख्या 32 होती. रेल्वेतून खाली पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना 8400 लोकांचा मृत्यू झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार मागील वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वे अपघात झाले. यामध्ये उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात रेल्वे अपघातात 1922 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर प्रदेशात 1558 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. बिहार दुसऱया आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, 2019 च्या रेल्वे अपघातांच्या स्थितीत 2020 मध्ये सुधारणा दिसून येते. 2019 मध्ये 27,987 रेल्वे अपघात झाले होते तर 2020 मध्ये 13,018 अपघात झाले आहेत.