एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील जागावाटप 2019 प्रमाणेच असेल असा खुलासा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. तर किर्तीकरांच्या या मुद्द्यावर भाजपने अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे.
2019च्या लोकसभा निवडणूका शिवसेना आणि भाजपने यांच्या युतीने एकत्र लढवली होती. याची आठवण करून देताना ते म्हणाले,
हेही वाचा >>>असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही; याचा निर्णय शिंदे आणि फडणवीस करतील- मुनगंटीवार
“शिवसेनेने गेल्यावेळी 48 पैकी 22 जागा लढवून 18 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 26 जागा लढवून 23 जागा जिंकल्या होत्या. त्यमुळे यावेळीही तशीच व्यवस्था असेल. आम्ही २०२४ च्या निवडणुकीसाठी आधीच तयारी सुरू केली आहे.” असे कीर्तीकर यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले.
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 18 लोकसभा सदस्यांपैकी 13 सदस्य़ांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला आहे. तर पाच लोकसभा सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्य केले आहे. शिवसेना- शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही आपल्या पक्षाला जागावाटपाचा फॉर्म्युला आहे तोच कायम राहण्याची आशा व्यक्त केली आहे.