वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये (असेसमेंट वर्ष 2020-21) 10 जानेवारी 2021 पर्यंत जवळपास 5.95 कोटीपेक्षा अधिकचा प्राप्तिकर परतावा (आयटीआर) प्राप्त झाला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 करीता जानेवारी 10 पर्यंत प्राप्तिकर जमा करण्याची अंतिम तारीख होती. चालू वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 28 लाखापेक्षा अधिकच्या आयटीआर फाईल सादर करण्यात आल्या आहेत.
वर्ष 2020-21 साठी 5,95,15,322 इतका प्राप्तिकर भरण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटीआर भरण्याचा कालावधी हा 31 ऑगस्ट केला होता. तेव्हा 5.67 कोटीपेक्षा अधिकचा प्राप्तीकर जमा करण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने सोशल मीडियाद्वारे दिलेली
आहे.
31 डिसेंबरपर्यंतचा आयटीआर
31 डिसेंबरला एकूण 4.37 कोटी आयटीआर भरण्यात आले होते. प्रथमच आयटीआरची तारीख 31 जुलै ते 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. सरकारने नागरिकांसाठी आयटीआर सादर करण्याचा कालावधी 10 जानेवारी तर कंपन्यांसाठी 15 फेबुवारीपर्यंत वाढविला आहे.









