काहीशा वाढीसोबत निर्यात 3.50 लाख टनावर
नवी दिल्ली
देशातील कॉफीची निर्यात 2019 मध्ये काहीशा प्रमाणात वाढून 3.50 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. मागील वर्षात 3.48 लाख कॉफीची निर्यात झाली होती. भारत आशियातील तिसऱया क्रमाकांचा सर्वात मोठा कॉफी उत्पादन आणि निर्यात करणार देश आहे. भारताची कॉफी इटली, जर्मनी आणि रशिया या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात केली जाते. तर रोबस्टा आणि अरेबिका कॉफीच्या व्यतिरिक्त इंस्टेंट कॉफीची निर्यात करण्यात येते.
2019 मध्ये इटली मुख्य निर्यात बाजार
कॉफी बोर्डाकडून सादर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीतून 2019 मध्ये रोबस्टा कॉफीची निर्यात 4.10 टक्क्यांनी वाढून 1,86,360 टनावर पोहोचली आहे. 2018 मध्ये हा आकडा 1,79,004 टन राहिला आहे. भारताकडून 2019 मध्ये इटली हा मुख्य निर्यात बाजार राहिला आहे. या काळात 72,267 टन, जर्मनी 37,175 टन आणि रशियाला 28,573 टन कॉफीची निर्यात करण्यात आली आहे.








