2020 मध्ये जगभरात स्मार्टफोनचा आकडा 1.57 अब्ज युनिट् राहण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
सध्या जगभरात जो स्मार्टफोन वापरत नाही, तो विरळाच म्हणावे लागते परंतु या स्मार्टफोनची विक्री मात्र 2008 नंतर प्रथमच 2019 मध्ये कमी झाल्याची नोंद रिसर्च व ऍडव्हरडाईज कंपनी गार्टनर यांच्या ताज्या अहवालामधून करण्यात आली आहे. 2019 मध्ये स्मार्ट विक्रीसाठी मोठे आव्हानात्मक वर्ष म्हणून पाहिले आहे. परंतु 2019 च्या तुलनेत स्मार्टफोन वृद्धी 3 टक्क्यांच्या वाढीसोबत 2020 मध्ये जगभरात स्मार्टफोनचा आकडा हा 1.57 अब्ज यूनिट्वर पोहोचण्याचे संकेत व्यक्त केले आहे.
2020 मध्ये विक्री वाढणार?
गार्टनर यांच्या माहितीनुसार 2020 मध्ये विविध देशांमध्ये 5जी नेटवर्कची सुविधा उपलब्ध होण्याचा अंदाज मांडला आला आहे. कारण ज्या ग्राहकांनी फोन घेण्यासाठी थांबलेले होते. ते आता पूर्वीपेक्षा अजून कमी किंमतीत फोन उपलब्ध होण्याच्या अपेक्षेने पुन्हा 2020 मध्ये खरेदी करण्याची शक्यता आहे. यात 5जी स्मार्टफोन 2020 मध्ये 22.1 कोटी होण्याचे संकेत असून एकूण मोबाईल विक्री 12 टक्क्यांनी आणि 2021 मध्ये दुप्पट होत 48.9 कोटी मोबाईल संख्या होणार असल्याचे म्हटले आहे.
5 जी ला मागणी वाढणार
2020 मध्ये 5-जी स्मार्टफोनचे व्यापारीकरण मोठय़ा वेगाने होणार आहे. यात 300 डॉलरहून कमी किंमत असणाऱया 5जी स्मार्टफोनची घोषणा होणार आहे. यामध्ये 12 महिन्यांच्या कालावधीत 5जी फोनची विक्री दर 4 जी फोन पेक्षा अधिक राहण्याचा अनुमान आहे. 2020 मधील स्मार्टफोन विक्रीच्या बाबत ग्रेटर चीन आणि आशिया/ पॅसिफिकच्या बाजार पहिल्या आणि दुसऱया क्रमाकांवर कायम राहणार असल्याचे गार्टनरमधील रिसर्च उपाध्यक्ष एनेट जिमरमॅन यांनी सांगितले आहे.








