इटलीत नागरीयुद्धावेळी सैनिकाने लपविलेला
इटलीच्या एका जंगलातून 175 चांदीच्या नाण्यांचा खजिना मिळाला आहे. रोमन नागरी युद्धादरम्यान या नाण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीत पुरण्यात आले हेते असे सांगण्यात येत आहे.
चांदीची ही नाणी ख्रिस्तपूर्व 82 सालातील असल्याचे सांगण्यात येत असून त्यावेळी रोमन जनरल लुसियस कॉर्नेलियस सुल्लाने रोमन प्रजासत्ताकाच्या नेत्यांसोबत स्वतःच्या शत्रूंविरोधात युद्ध लढले होते, यात सुल्लाचा विजय झाला होता आणि त्यानंतर त्याला हुकुमशहा म्हणून ओळखले गेले होते.

पुरातत्व तज्ञांनी चांदीच्या या 175 नाण्यांची तपासणी केली आहे. ही नाणी एखाद्या रोमन सैनिकाने जमिनीत गाडली असावीत, जो नंतर युद्धात मारला गेला असावा असे त्यांचे म्हणणे आहे. या नाण्यांची किंमत आता हजारो डॉलर्समध्ये असल्याचे समजते.
ब्रिटनमधील न्यूकॅसल युनिव्हर्सिटीत क्लासिक्स आणि एंशिए&ट हिस्ट्रीचे प्रमुख तसेच इतिहासकार फेडेरिको सेंटेंजेलो यांचे मात्र वेगळेच मानणे आहे. त्यांच्यानुसार एखाद्या व्यापाऱयाने ही नाणी पुरून ठेवली असावीत. सेंटेंजेलो या संशोधनात सामील नव्हते. अशाप्रकारची नाणी जमा करणाऱया लोकांच्या कहाणींमधून युद्धादरम्यान ती सुरक्षित ठेवण्यासाठी पुरली जात होती असे समजते. अनेक लोक संकटावेळी स्वतःचे धन पुरत होते, परंतु काही कारणांमुळे हे धन त्यांना परत मिळविता आले नव्हते असे सेंटेजेलो यांनी म्हटले आहे. संशोधकांना ही नाणी एका मातीच्या भांडय़ात पुरलेल्या स्थितीत आढळून आली आहेत. पुरातत्व तज्ञांच्या समुहाने टस्कनीमध्ये लिवोर्नो शहरानजीकच्या जंगलात सर्वेक्षण केले आहे.









