प्रतिनिधी / सांगली
सांगलीच्या बाजारपेठेत 2000 रुपये किलों विकली जाणारी ऑस्ट्रेलियन चेरी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. सांगलीमध्ये परदेशी फळांना मोठी मागणी असते ही फळे तुलनेने महाग आहेत. पण तरीही त्यांना मागणी असल्याचे येथील फळ विक्रेत्याकडून सांगण्यात आले.
दिसायला अत्यंत आकर्षक, लाल भडक, आणि चवीला गोड अशा चेरीची किंमत मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही.








