प्रतिनिधी /म्हापसा
गॅलेक्सी हॉस्पिटलनजीक फेर मानोर येथे असलेल्या कंन्स्ट्रक्शन जागेतील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱया 200 लोखंडी प्लेट गोदामातून रिक्षेने चोरून नेल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोघां इसमांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये उज्वल सुकुमार बिस्वास वय 24 वर्षे रा. शेळपे धुळेर व प्रेमकुमार गौरचंद पाल वय 30 रा. मुड्डेर बादे हणजूण मुळ रा. वेस्ट बंगाल यावा अटक करण्यात आली आहे.
या प्लेट चोरून मुड्डेर हणजूण येथे ठेवण्यात आल्या होत्या. त्या पंचनामा करून पोलिसांनी जप्त केल्या तसेच चोरीसाठी वापरलेला मिनी टॅम्पो जीए-03एएच-0528 व जीए-03के-4056 हे ताब्यात घेऊन सिल केले आहेत. याप्रकरणी विरेश कमलनाथ नाडकर्णी रा. कामत हार्मोनी सांतईनेज ताळगाव यांनी म्हापसा पोलीस स्थानकात रितसर चोरीची क्रार दिली होती. पोलीस उपनिरीक्षक आशिष परब यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुशांत परब, प्रकाश पोळेकर, राजेश कानोळकर, अभिषेक कासार, अक्षय पाटील, यांनी ही कारवाई केली. उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.









