प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱयांकडून कठोर पावले उचलण्याचा धडका एसटी प्रशासनाकडून कायम ठेवण्यात आला आह़े आतापर्यंत 100 हून अधिक कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले आहे. आणखी 200 एसटी कर्मचाऱयांना बडतर्फीची नोटीस पाठवली आह़े विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
मागील 4 महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱयांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत़ त्याचप्रमाणे एसटी विभागाला देखील मोठे नुकसान सहन करावे लागत आह़े यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱयांवर आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली आह़े सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात येत आह़े त्यासंबधी कर्मचाऱयांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठविण्यात येत आह़े
दरम्यान काही कर्मचाऱयांनी कामावर हजर राहण्यास उत्सुकता दाखविली आह़े मात्र त्यासाठी बडतर्फीची कारवाई मागे घ्यावी अशी विनंती करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े दरम्यान कारवाई मागे घेण्यासंबधी निर्णय हा राज्यस्तरावरून घेण्यात येईल़ रत्नागिरी विभागातून कारवाई मागे घेण्यात येणार नसल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े
शुक्रवारी एसटीच्या 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े एसटीचे चालक व वाहक मोठय़ा संख्येने कामावर हजर होत असल्याचे दिसून येत आह़े तब्बल 170 चालक वाहक कामावर हजर झाल्याचे एसटीकडून सांगण्यात आले आह़े रत्नागिरी आगारातून देखील 4 फेऱया सोडण्यात आल्य़ा प्रवाशांचा देखील उत्तम प्रतिसाद या फेऱयांना लाभत आह़े असे असले तरी अद्यापही मोठय़ा प्रमाणावरील कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आह़े
जिह्यात आता एकूण 700 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात सोमवारी 400 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक वाहक कामावर हजर रहावेत यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी पर्यंत्न करण्यात येत आहेत.









