प्रतिनिधी/ बेंगळूर
अलिकडेच उत्तर कर्नाटकासह तेलंगणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. काही भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरलेला असला तरी बंगालच्या उपसागरात 19 ऑक्टोबर रोजी पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून 20 आणि 21 रोजी उत्तर कर्नाटकात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बागलकोट, बिदर, रायचूर, गदग, कोप्पळ, गुलबर्गा या जिल्हय़ांमध्ये दोन दिवस दमदार पाऊस होण्याची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आले आहे. पुढील चोवीस तासांमध्ये ढग पश्चिमेला सरकणार आहेत. परिणामी उत्तर महाराष्ट्र, दक्षिण किनारपट्टीजवळ वादळी वाऱयासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.









