प्रतिनिधी/ बेळगाव
एकस फौंडेशनने बिम्स हॉस्पिटलला 20 लाख रुपये किमतीचे हायफ्लो नेझल ऑक्सिजन दिले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी या उपकरणाची मदत होणार आहे.
रुग्णाला श्वासोच्छवास करताना त्रास होऊन त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली गेल्यास ती रोखण्यासाठी हे उपकरण साहाय्यभूत ठरणार आहे. एकस फौंडेशनचे संचालक डॉ. प्रवीणकुमार नाईक यांनी बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्याकडे ही उपकरणे सुपूर्द केली. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते.
याच पद्धतीची उपकरणे एकस फौंडेशनतर्फे हुबळी येथील किम्स आणि कोप्पळ येथील वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येणार आहेत.









