कोल्हापूर
आरोग्य विभाग सतर्क
महाराष्ट्र सध्या जी बी सिंड्रोम आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे, सोलापूर, नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्ये देखील जीबीएसचे २ रुग्ण आढळले आहेत. विशेषत: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यात जीबीएस आजाराने शिरकाव केल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून उपाय योजना सुरू करण्यात आला आहे. दरम्यान २ रुग्ण मिळताच आज सकाळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अधिष्ठाता एस एस मोरे यांच्या उपस्थितीत बैठक देखील पार पडली.
सध्या पुण्यात थैमान घालणाऱ्या जीबी सिंड्रोम ने आता कोल्हापूरात ही शिरकाव केलाय.कोल्हापूरमध्ये जीबी सिड्रोमचे दोन रुग्ण आढळले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी येथील साठ वर्षाचे वृद्ध आणि हुपरी येथील बारा वर्षाच्या मुलीला जीबीएसची लागण झाली आहे. दोघांवर देखील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याच अधिष्ठाता एस एस मोरे यांनी सांगितलं आहे ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
आज दोन रुग्ण मिळून आल्यानंतर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले असून उपाययोजना संदर्भात आज वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक ही पार पडलीय असून यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले असल्याच अधिष्ठाता एस एस मोरे यांनी म्हटलंय. तसेच कोल्हापुरात सध्या जास्त रुग्ण नसले तरी प्रशासन पूर्वतयारी म्हणून 70 व्हेंटिलेटर तसेच या आजारासाठी लागणाऱ्या औषधाचा साठा देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं अधिष्ठाता एस.एस. मोरे यांनी सांगितले आहे. तसेच खबरदारी म्हणून जनतेनी पाणी उकळून प्याव, चांगल शिजवलेलं अन्न खावे, बाहेर खाण टाळावे असे ही सांगण्यात आले आहे.तसेच सी पी आर रुग्णालयात महिन्याला पाच ते सहा जीबी सिंड्रोम चे रुग्ण दाखल होऊन ठणठणीत बरे होत आहेत. यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleभरधाव वेगाने कार चालून झाडावर आदळली
Next Article वेंगुर्लेतील आरोग्य शिबिरात ३५६ रुग्णांनी घेतला लाभ








