प्रतिनिधी / धारबांदोडा
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज भरण्याच्या तिसऱया दिवशी बुधवार 20 रोजी धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा पंचायतीच्या प्रभाग 1 मधून संजना भिंगो नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. तर दाभाळ किर्लपाल पंचायतीच्या प्रभाग 3 मधून इवारिस्टो उबालदिनो इनासियो फर्नांडिस यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
धारबांदोडा तालुक्यात एकूण पाच पंचायती असून 41 प्रभाग आहेत. आत्तापर्यंत साकोर्डा व दाभाळ किर्लपाल या दोन पंचायतीमधून प्रत्येकी 1 उमेदवारी अर्ज दाखल झाला असून मोले, कुळे, शिगांव व धारबांदोडा पंचायतीमधून अद्याप एकही अर्ज आलेला नाही.









