वर्तमान मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून चन्नी लक्ष्य
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. धर्मशाळा येथे क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गेलो असता तेथे एक खेळाडू भेटला. हा खेळाडू शासकीय नोकरी मिळावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना भेटला होता. परंतु काँग्रेसने कॅप्टन यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवत चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले होते. चन्नी यांनी या खेळाडूला स्वत:च्या भाच्याला भेटण्याची सूचना केली होती. चन्नी यांच्या भाच्याने या खेळाडूकडे लाच मागितली होती असा आरोप भगवंत मान यांनी केला आहे.
चन्नी यांच्या भाच्याने ‘2’ लागतील असे खेळाडूला सांगितले होते. या खेळाडूला 2 लाख रुपये मागितले असावेत असे वाटले हेते. हा खेळाडू 2 लाख रुपये घेऊन चन्नी यांच्या भाच्याकडे पोहोचल्यावर त्याने शिविगाळ केली होती. 2 चा र्थ दोन कोटी रुपये होतो असे चन्नीच्या भाच्याने खेळाडूला सुनावले होते असा दावा भगवंत मान यांनी केला आहे.
काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी दक्षता विभागाकडून चौकशी सुरु आहे. मागील महिन्यात दक्षता विभागाने 7 तासांपेक्षा अधिक काळापर्यंत चन्नी यांची चौकशी केली होती. दक्षता विभागाने यावेळी मायनिंग प्रकरणी चन्नी यांचे भाचे भूपिंदर हनीकडून हस्तगत 10 कोटी रुपयांबद्दल विचारणा केली होती.
माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्याविरोधात खोटे गुन्हे नोंदविले जात आहेत. माझ्या संपत्तीच पूर्ण तपशील दक्षता विभागासमोर सादर केल्याचा दावा चन्नी यांनी केला आहे.









