प्रतिनिधी/रत्नागिरी
‘तुमचे वीजबील ऍप अपडेट झाले नसल्याने एक ऍप डाऊनलोड करा’, अशी बतावणी करून महिलेला 2 लाख 11 हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े. सविता श्रीपाद नाटेकर (59, नाचणे रोड रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आह़े या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े.
पोलिसांनी या प्रकरणी राहुल चतुर्वेदी व दीपक शर्मा नावाच्या इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता यांना राहुल व दीपक शर्मा यांनी 16 जुलै रोजी मोबाईलवर कॉल केला व वीजबील अॅप अपडेटसाठी प्ले स्टोअरवरून क्वीक सपोर्ट ऍप डाऊनलोड करण्यास सांगितल़े. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सविता यांनी ऍप डाऊनलोड केल़े.दरम्यान संशयितांनी कस्टमर आयडी, जन्मतारीख, आईचे नाव आदी माहिती घेतल़ी ही माहिती सविता यांनी देताच त्यांच्या खात्यामधून 2 लाख 11 हजार रूपये वजा झाल़े आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सविता यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी.









