अर्बन कंपनीचा समभाग होणार सुचीबद्ध : आयपीओला दमदार प्रतिसाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यामध्ये शेअरबाजारात दोन आयपीओ आणि 11 आयपीओ सुचीबद्ध होणार आहेत. यामध्ये अर्बन कंपनीच्या आयपीओचाही समावेश आहे. मेन बोर्डावरती दोन कंपन्यांचे आयपीओ सादर केले जाणार असून तीन आयपीओ एसएमईवर सादर केले जाणार आहेत. मेन बोर्डावर युरो प्रतिक सेल्स आणि व्हीएमएस टीएमटी यांचे आयपीओ लाँच केले जाणार आहेत. युरो प्रतिक सेल्सचा आयपीओ 451 कोटी रुपयांचा असणार आहे. याकरिता 235 ते 247 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. 16 सप्टेंबर रोजी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 18 तारखेला बंद होणार आहे. सजावटी भिंतीच्या पॅनलच्या निर्मितीचे काम सदरची कंपनी करते. सदरचा समभाग 23 सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर सुचिबद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हीएमएस टीएमटी ही गुजरातमध्ये स्टील बार निर्मिती करणारी कंपनी असून कंपनी आयपीओच्या माध्यमातून 148 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये 1.5 कोटी ताजे समभाग विक्रीला ठेवले जाणार असल्याचे समजते. कंपनीचा आयपीओ 17 सप्टेंबर रोजी खुला होऊन 19 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. 94 ते 99 रुपये प्रति समभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. सदरचा आयपीओ 24 सप्टेंबर रोजी दोन्ही निर्देशांकांवर सुचिबद्ध होण्याची शक्यता सांगितली जात आहे.
यांचेही येणार आयपीओ
यासह टेकडिफेन्स लॅब्स, संपत अॅल्युमिनियम आणि जेडी केबल्स यांचेही आयपीओ सादर केले जाणार आहेत. टेकडिफेन्स 15 सप्टेंबरला खुला होऊन 17 सप्टेंबरला बंद होईल. 38 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार असून याअंतर्गत ताजे समभाग कंपनी विक्रीला सादर करणार असून समभागाची किंमत 183 ते 193 रुपये प्रतिसमभाग निश्चित करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर रोजी कंपनीचे समभाग बाजारात लिस्ट होतील.
संपत अॅल्युमिनियम आयपीओच्या माध्यमातून 30 कोटी रुपये उभारणार असून 17 सप्टेंबरला आयपीओ खुला होऊन 19 सप्टेंबरला बंद होणार आहे. 114 ते 120 रुपये प्रतिसमभाग अशी आयपीओची इशु किंमत ठेवण्यात आली आहे. 22 सप्टेंबर रोजी समभाग सुचिबद्ध होऊ शकतो. जेडी केबल्सचा आयपीओ 18 ला खुला होऊन 22 सप्टेंबरला बंद होणार आहे. 95 कोटी रुपये आयपीओतून उभारणार आहे.









