हिरेबागेवाडी टोलनाक्यावर योग्य कागदपत्रांविना खासगी बसमधून वाहतूक करणारी दोन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईहून बंगळुरूकडे निघालेल्या खासगी बसची तपासणी केली असता, एफएसटी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाला सदर अवैध पैसे आढळून आले.केपी एक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. वृत्त समजताच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देऊन आढावा घेतला. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. डीसीपी स्नेहा, ग्रामीण एसीपी गोपालकृष्ण गौडा, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राजशेखर डंबाला, सीपीआय अमरेश, एफ.एस.टी. शंभुलिंगप्पा, राजेंद्र मोराबाडा या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.पोलीस आणि जिल्हा निवडणुक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त डॉ.एम.बी. बोरलिंगय्या यांनी पथकाच्या कार्याचे कौतुक केले.