रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीक टीआरपी साई एजन्सी स्टॉप जवळ डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. हा अपघात इतका भीषण होता की, डंपरने धडक दिल्यानंतर दोघे दुचाकीस्वार डंपरच्या मागच्या चाकात अडकून काही अंतर फरफटत गेल्याचे उपस्थितांनी पाहिले. त्यामुळे त्या दोघां दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघांपैकी एकाची ओळख पटली आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाल्याने त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांमार्फत सुरू होते. मुक्तेश्वर सहदेव ठीक रा. विमानतळ प्रशांत नगर, रत्नागिरी असे एका मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. डंपर कुवारबाव येथून जे के फाईलच्या दिशेने जात होता. तर मोटरसायकल चालक देखील याच मार्गाने जात होता असे पोलिसांनी सांगितले.
Previous Articleहिवाळे गावात भाजपला धक्का
Next Article चाफेड येथील उ.बा.ठा.चे शेकडो नागरिक भाजपामध्ये
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








