एका संशयिताला अटक : सीआयडीने केली कारवाई
पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सांगोल्डा येथे केलेल्या कारवाईत 2 लाख 80 हजार ऊपये किमंतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव अश्वानी उर्फ अनिल श्रीप्रकाश विश्वकुमार असे आहे. संशयीत मुळ उत्तर प्रदेश येथील असून तो कुचेली म्हापसा येथे राहत होता. संशयीत गांजा विक्री करण्यासाठी सांगोल्डा येथे येणार असल्याची माहिती साआयडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करून संशयिताला रंगेहात अटक केली त्याच्याकडून 2 किलो 800 ग्रॅम गांजा तप्त केला. पुढील कारवाई सीआयडी पोलीस करीत आहे. सीआयडी निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालयाचे कर्मचारी अशोक गावडे तसेच साआयडीचे कॉन्स्टेबल नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, महाबळेश्वर सावंत, राजेश शिरगावकर, संदेश कांबळी, कमलेश धारगळकर यांनी ही कारवाई केली आहे.









