प्रतिनिधी/ बेंगळूर
शिक्षण खात्यासह राज्यातील 43 खात्यांमध्ये एकूण 2.76 लाख पदे रिक्त असल्याची अधिकृत सरकारी माहिती उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या 43 खात्यांमध्ये एकूण 2,76,386 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 16,017 पदे अ श्रेणी, 16,734 ब श्रेणी, 1,66,021 क श्रेणी आणि 77,614 ड श्रेणीची पदे रिक्त आहेत, असे सांगण्यात आले. शिक्षण खात्यात सर्वाधिक 70,727 पदे रिक्त आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खाते-37,069, गृह प्रशासन खाते- 26,168, महसूल खाते-11,145 आणि ग्रामीण विकास खात्यात 10,898 पदे रिक्त आहेत. कंत्राटी आणि आउटसोर्सिंग आधारावर गट-क संवर्गातील (स्टेनोग्राफर, टायपिस्ट, वाहन चालक आणि गट-ड समकक्ष) आणि तांत्रिक पदांची 96,844 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विविध खात्यांच्या विविध संवर्गातील एकूण 4,673 पदे भरण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे.









