‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बेंगळूर विमानतळावरून देश-विदेशांत निर्यात
प्रतिनिधी / बेंगळूर
यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त सुमारे 2.73 लाख किलो गुलाबाची फुले बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विविध 41 राज्ये आणि देशांना पाठविण्यात आली होती. 1 लाख 73 हजार किलो गुलाब विविध देशांना तर 1 लाख 3 हजार किलो फुले विविध राज्यांना पाठविण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
व्हॅलेंटाईन डे साठी राज्यातील गुलाबांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा कोरोना परिस्थितीत देखील मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली आहे. विमानतळाच्या कार्यकारी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा व्हॅलेंटाईन डे निमित्त केंपेगौडा विमानतळावरून एकूण 6.4 दशलक्ष गुलाब फुले विविध ठिकाणी पाठविण्यात आली होती. सिंगापूर, लंडन, कौलालंपूर, बैरुत, मनिला आणि ऑकलंड या ठिकाणी गुलाब पाठवून देण्यात आले होते. सुमारे 2.6 दशलक्ष लाल रंगाचे गुलाब कोलकाता, दिल्ली, चंदीगढ, मुंबई, जयपूर, चेन्नई आणि अहमदाबाद शहरांना पाठविण्यात आले.
2018 मध्ये 5.2 दशलक्ष गुलाबांची निर्यात केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो सेवा निर्वाहक, एअर इंडियाच्या एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसस लि. आणि मेन्जीस एव्हीएशन बेंगळूर प्रा. लि. कडून हे गुलाब पाठविण्यात आले आहेत. 2018 मध्ये केंपेगौडा विमानतळावरून 5.2 दशलक्ष गुलाब पाठविण्यात आले होते.









